Best weather app for Indian farmers: आजची शेती ही केवळ पारंपरिक पद्धतीवर चालणारी नाही, तर ती हळूहळू शास्त्रीय आणि तंत्रज्ञानाधिष्ठित होत चालली आहे. बदलत्या हवामानामुळे शेतीतील अनिश्चितता वाढली आहे, मात्र यावर आधुनिक तंत्रज्ञानाने तोडगा शोधला आहे. आता शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाइलवरून हवामानाचा अचूक अंदाज, खतांचे योग्य प्रमाण, कीड नियंत्रण, सिंचन, पेरणी ते कापणीपर्यंतचा सल्ला मिळणार आहे. ‘मेघदूत’, ‘आयएमडी’ आणि ‘स्कायमेट’ ही मोबाइल ॲप्स शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आली आहेत आणि शेतीला अधिक शास्त्रीय आणि फायदेशीर बनवत आहेत.
हवामान आणि शेती (agricultural advisory services)
शेती हा व्यवसाय पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असतो. पावसाच्या वेळा, वाऱ्याचा वेग, आर्द्रता, तापमान या सगळ्या गोष्टींमुळे पिकाचे उत्पादन, गुणवत्ता आणि नफा यावर परिणाम होतो. पूर्वी या गोष्टींचा अंदाज बांधणे कठीण होते, पण आता स्मार्टफोनमधूनच हवामानाचा अचूक अंदाज मिळतो आहे.
उदाहरणार्थ, वेळेआधी पेरणी केल्यास पावसाअभावी बियाण्यांची उगम क्षमता कमी होऊ शकते. याउलट योग्य वेळेची वाट पाहून पेरणी केल्यास पीक अधिक चांगले उगवते. कापणीच्या वेळीही हवामान कोरडे आणि स्थिर असणे महत्त्वाचे असते, अन्यथा पावसामुळे पीक खराब होऊ शकते. हे सगळं लक्षात घेता, हवामानाचा अचूक अंदाज हे शेतकऱ्यांचे सर्वात मोठं शस्त्र बनू शकतं.
मेघदूत ॲप – तुमचा जिल्हानिहाय शेती सल्लागार (best farming apps for Indian farmers)
‘मेघदूत’ हे ॲप भारतीय हवामान विभाग (IMD) आणि भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) यांच्या संयुक्त प्रयत्नातून तयार करण्यात आले आहे. हे खास शेतकऱ्यांसाठी बनवलेलं ॲप असून यात पुढील 5 दिवसांसाठी जिल्हानिहाय हवामान अंदाज दिला जातो. या ॲपमध्ये खालील माहिती मिळते (Meghdoot app features)
• तापमान
• पर्जन्यमान (पावसाचा अंदाज)
• आर्द्रता
• वाऱ्याचा वेग
यासोबतच, हवामानानुसार पीक सल्लाही दिला जातो, जसे की:
• कोणते पीक घ्यावे?
• खतांचे प्रमाण किती ठेवावे?
• कीडनाशकांची फवारणी कधी करावी?
• सिंचनाची गरज आहे का?
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हे ॲप स्थानिक भाषांमध्ये उपलब्ध आहे, ज्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी सहजपणे त्याचा उपयोग करू शकतात.
आयएमडी आणि स्कायमेट – हवामानाचा पुढील अचूक अंदाज
‘IMD Weather’ (आयएमडी) हे सरकारी ॲप असून ते देशभरातील हवामानाची माहिती देते. या ॲपद्वारे शेतकऱ्यांना पर्जन्याची शक्यता, गारपीट, वादळी वाऱ्यांचा इशारा (Yellow, Orange, Red अलर्ट्स) मिळतो, त्यामुळे ते आपल्या पिकांचे संरक्षण करू शकतात.
दुसरीकडे, ‘Skymet’ हे खासगी ॲप असून ते उपग्रहाद्वारे प्राप्त माहितीवर आधारित हवामान अंदाज पुरवते. यामध्ये सखोल विश्लेषणाद्वारे हवामानाचा अल्पकालीन तसेच दीर्घकालीन अंदाज दिला जातो. स्कायमेटवरून मिळणारा कृषी सल्ला आणि हवामान डेटा शेतकऱ्यांना उत्पादन नियोजन करण्यात खूप उपयुक्त ठरतो.
आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतीत काय फरक पडतोय? (agriculture technology in India)
तालुका कृषी अधिकारी रवींद्र घुले यांच्यानुसार, “बदलत्या हवामान परिस्थितीत अचूक हवामान माहिती असणे ही आता गरज बनली आहे.” आज या ॲप्समुळे शेतकऱ्यांना फक्त हवामानच नव्हे, तर पीक संरक्षण, उत्पादन वाढ, कीड-रोग नियंत्रण, फवारणीचे वेळापत्रक आणि साठवण याविषयीही मार्गदर्शन मिळते. त्याचे फायदे (Benefits of weather forecast apps for farmers)
• उत्पादन खर्चात बचत
• योग्य वेळी पीक नियोजन
• रोग आणि कीटकांपासून बचाव
• साठवणीसाठी योग्य हवामानाची माहिती
• उत्पादनात वाढ आणि अधिक नफा
शेतकऱ्यांचा स्मार्ट सहकारी (smart farming apps)
शेतीमध्ये यशस्वी होण्यासाठी फक्त मेहनतच नाही तर योग्य माहिती आणि अचूक नियोजन आवश्यक असते. आज ‘मेघदूत’, ‘IMD’ आणि ‘Skymet’ यांसारखी ॲप्स शेतकऱ्यांना हे सर्व काही देत आहेत – तेही मोफत आणि त्यांच्या भाषेत